पुलगाव (विशेष प्रतिनिधी):
दिनांक १८ सप्टेंबर २०२६ रोजी AIMIM चे वर्धा जिल्हाध्यक्ष आसिफ खान साहेब यांच्या पुलगाव दौऱ्यादरम्यान ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सोहळा पार पडला. पुलगाव शहरातील अनेक जबाबदार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी AIMIM मध्ये प्रवेश करत पक्ष मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा दृढ संकल्प केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) अल्पसंख्याक विभागाचे पुलगाव विधानसभा अध्यक्ष वसीम शेख उर्फ बबलू भाई तसेच तहसील अध्यक्ष सलीम शेख यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह AIMIM पक्षात अधिकृत प्रवेश केला.
कार्यक्रमात वर्धा जिल्हाध्यक्ष आसिफ खान साहेब यांच्या शुभहस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
AIMIM पुलगाव शहर कमिटीची नवीन कार्यकारिणी खालीलप्रमाणे:
- शहर अध्यक्ष: वसीम शेख उर्फ बबलू भाई
- उपाध्यक्ष: सलीम शेख, शम्सुद्दीन अंसारी, शेख महमूद
- महासचिव: सैयद मोहसिन अली, शब्बीर खान न्यामत खान
- सचिव: अरहान शेख, अरमान शेख
- सोशल मीडिया प्रमुख: रेहान शेख
- सदस्य: फारुक शेख, शेख चाँद, आमीन पठाण, इरफान भाई, शंकरराव वासनिक, अशफाक भाई मंसूरी, खलील अहमद शेख
या सोहळ्याला AIMIM वर्धा सोशल मीडिया प्रमुख आवेझ शेख, वर्धा शहर सचिव राजिक खान, शेरू भाई, इफ्फू भाई यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष आसिफ खान साहेब यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून जबाबदारी मेहनतीने पार पाडण्याचे आवाहन केले.
AIMIM चा संदेश: प्रत्येक समाजाच्या हक्क, न्याय आणि विकासासाठी एकत्रितपणे काम करणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे.
बातमी संकलन: अर्पित वाहाणे (मो. ८९५६६४७००४)

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या