Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गणेश विसर्जन केंद्रावर पर्यायी विसर्जन; वर्ध्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

 



​वर्धा (विशेष प्रतिनिधी): अर्पित वाहने 

नदी, नाले, तलाव आणि विहिरींचे वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) वतीने वर्धेतील अनेकांत स्वाध्याय मंदिर परिसरात गणेश विसर्जन केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रात ५० हून अधिक श्रीमूर्तींचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले असून, अंनिसच्या या उपक्रमाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.

​गणेशभक्त शंकरराव तेलरांधे यांनी दान केलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन नगरसेवक पवन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अंनिसचे जिल्हाध्यक्ष बाबाराव किटे, अनेकांत स्वाध्याय मंदिराचे संचालक अरुणभाऊ चवडे आणि अंनिसचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार प्रामुख्याने उपस्थित होते.

​महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली १७ वर्षे महाराष्ट्रभर गणेशमूर्ती दान व निर्माल्य दान मोहीम राबवत आहे. अंनिसने औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या सकारात्मक निकालानंतर सरकार व स्थानिक प्रशासनाने पर्यायी विसर्जन व्यवस्था उभारण्यास सुरुवात केली. वर्धेत अंनिसची जिल्हा व शहर शाखा, अनेकांत स्वाध्याय मंदिर आणि रोटरी क्लब ऑफ गांधी सिटी यांच्या सहकार्याने ही मोहीम दरवर्षी यशस्वीपणे राबवली जाते. अंनिसच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पवणार येथील नदीचे प्रदूषण थांबवण्यासाठी प्रशासनाने मोठा विसर्जन हौद तयार केला असून, नगरपरिषदेनेही शहरात ठिकठिकाणी पर्यायी व्यवस्था केली आहे.

​या कार्यक्रमाला राज्य पदाधिकारी सारिका डेहनकर व प्रकाश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा प्रधान सचिव सुनील ढाले व अनिल मुरडीव यांनी केले, तर सूत्रसंचालन युवा विभाग प्रमुख निखिल जवादे यांनी केले. उपस्थितांचे आभार महिला विभागाच्या जिल्हा कार्यवाह द्वारकाताई इमडवार आणि राजेंद्र ढोबळे यांनी मानले.

​कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. मंजुषा देशमुख, रिंकू घोडेस्वार, तनू वराडे, मयुरी बिजवार, सुनीता सहारे, विक्की बिजवार, पंकजा गादेवार, कविता लोहट, आशिष रायपुरे, सचिन महंतारे, मनोज नरांजे, विवेक भिरंगे, चैतन्य जोशी, सतीश मोहनापुरे, रवी तडस, गोलू मानकर, आदित्य दरने, चैतन्य धनविज, प्रशिक गोडघाटे व अनेकांत स्वाध्याय मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या