आर्वी (विशेष प्रतिनिधी):
येथील स्टेशन वार्ड स्थित त्रिशरण बुद्ध विहारात रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री धम्म प्रवचन कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व धम्ममय वातावरणात संपन्न झाला.
या प्रसंगी भंते रेवत बोधी महास्थवीर यांनी उपस्थितांना सखोल धम्ममार्गदर्शन केले. "भगवान बुद्धांनी सांगितलेल्या करुणा, प्रज्ञा, शील आणि समतेच्या मूल्यांचा दैनंदिन जीवनात सर्वांनी अंगीकार करावा. बुद्धांचा धम्म हा केवळ धार्मिक विचार नसून मानवकल्याण, मैत्री आणि विवेकाचा मार्ग आहे. समाजात खरी बंधुता व सद्भावना निर्माण करण्यासाठी धम्मविचार आचरणात आणणे ही काळाची गरज आहे," असे प्रतिपादन त्यांनी आपल्या प्रवचनातून केले. भंतेजींच्या या ओघवत्या आणि प्रबोधनात्मक वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये धम्माविषयी विशेष सकारात्मक ऊर्जा व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून धम्मप्रचारक सुरेश भिवगडे (आर्वी), आदर्श एकता सामाजिक संघटनेचे (महाराष्ट्र राज्य) मान. गौतम कुंभारे, तसेच सामाजिक कार्यकर्ते मान. संदीप सरोदे (आर्वी) लाभले होते.
कार्यक्रमाचे नेटके आणि सूत्रबद्ध सूत्रसंचालन शुभांगी गौतम कुंभारे यांनी केले. या सोहळ्यास परिसरातील धम्मप्रेमी, उपासक-उपासिका व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विहारातील कार्यकर्ते तसेच सर्व स्थानिक नागरिकांनी विशेष परिश्रम व सहकार्य घेतले. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शांततामय, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
बातमीदार / वृत्त संकलन:
अर्पित वाहाणे
मो. ८९५६६६४७००४

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या