Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

आझाद समाज पार्टीचे अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन

 



  • ​खासदार भाई चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध
  • ​आरोपींवर कठोर कारवाई व Z+ सुरक्षा देण्याची राष्ट्रपतींकडे मागणी

अमरावती (विशेष प्रतिनिधी): अर्पित वाहणे 

आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा नगीना लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाई चंद्रशेखर आझाद यांच्यावर शहाबाद येथील टोल नाक्यावर अडवून झालेल्या भ्याड व जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावती येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. आझाद समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष (पश्चिम विभाग) प्रवीण सु. मोहोड यांच्या नेतृत्वात एकदिवसीय धरणे आंदोलन पार पडले.

​या आंदोलनात पक्षनेत्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. विद्यमान खासदारावर अशा प्रकारे हल्ला होणे ही लोकशाही व्यवस्था, संविधानिक मूल्ये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी अत्यंत गंभीर बाब असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. आंदोलनकर्त्यांच्या वतीने अमरावती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भारताच्या सन्माननीय राष्ट्रपती महोदयांना निवेदन सादर करण्यात आले.

प्रमुख मागण्या:

  • ​खासदार भाई चंद्रशेखर आझाद यांच्यावरील हल्ल्याची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
  • ​या भ्याड हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार व कटाचा पर्दाफाश करून आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी.
  • ​खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेता त्यांना तातडीने Z+ सुरक्षा मंजूर करण्यात यावी.

प्रमुख नेत्यांची उपस्थिती:

या आंदोलनाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मनीष भाऊ साठे आणि महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख उमेश भाऊ हिवराळे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ देवरे, प्रदेश सचिव सुदाम बोरकर, प्रदेश प्रवक्ता प्रा. प्रमोद मेश्राम सर, रवींद्र फुले सर, विभागीय उपाध्यक्ष हर्षद अली, युवक शहर अध्यक्ष नितीन काळे, अंकुश आठवले, विक्रम तसरे, प्रवीण वानखडे, अमोल खंडारे, चंदू मोहोळ, विजय मोहोळ, सुरज दांडगे, मंगेश वानखडे, उमेश दुर्योधन, अक्षय पांडे, सुशील वानखडे, रोशन गडालिंग, जंजीर टाक, संघर्ष फुले, अश्विन थोरात, शैलेश थोरात आणि अनिकेत चोपडे यांच्यासह पक्षाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​शासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास संपूर्ण राज्यभरात संविधानिक मार्गाने अधिक तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा या वेळी पक्षाच्या वतीने देण्यात आला.

बातमी संकलन / संपर्क:

अर्पित वाहाणे

मो. ८९५६६४७००४

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या