Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

AIMIM पुलगाव शहरात पार पडली महत्त्वाची बैठक; संघटना बळकटीकरणावर भर!

 


AIMIM पुलगाव शहरात पार पडली महत्त्वाची बैठक; संघटना बळकटीकरणावर भर!

​पुलगाव :

येथील AIMIM पक्षाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. AIMIM वर्धा जिल्हा अध्यक्ष आसिफ खान साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पुलगाव शहर अध्यक्ष वसीम शेख उर्फ बबलू भाई यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पुलगाव शहर कमिटीचे सर्व पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​बैठकीदरम्यान पक्षाचे ध्येय-धोरण, संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे आणि पक्षाची विचारधारा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे यावर सविस्तर चर्चा झाली. सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पक्ष संघटन वाढवण्यासाठी आणि पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी संकल्प केला.

​अनेक नवोदितांचा AIMIM मध्ये जाहीर प्रवेश

याच बैठकीचे औचित्य साधून वर्धा जिल्हा अध्यक्ष आसिफ खान साहेब यांच्या हस्ते अनेक नवीन कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी AIMIM पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षाच्या विचारधारेशी जोडून घेऊन पूर्ण निष्ठेने, प्रामाणिकपणे कार्य करत पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार नवीन प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केला.

​या बैठकीला पुलगाव शहर अध्यक्ष वसीम शेख (बबलू भाई), शहर कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी काळात पक्षाचे उपक्रम आणि सामाजिक कार्य अधिक गतीने पुढे नेण्यावर या वेळी एकमुखाने चर्चा झाली.

​रिपोर्टर: अर्पित वाहाणे

मोबाईल नं.: 8956647004

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या