Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

सेवा संकल्प अभियानांतर्गत ESIS हॉस्पिटल सोमवारीपेठ येथे योग शिबिर व जीवनशैली विकार जनजागृती कार्यक्रम संपन्न

 



​नागपूर (विशेष प्रतिनिधी):

सेवा संकल्प अभियानांतर्गत रुग्ण आणि कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ESIS हॉस्पिटल, सोमवारीपेठ, नागपूर येथे योग शिबिर तसेच जीवनशैली विकार जनजागृती कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हे आयोजन ESIS हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक (मेडिकल सुपेरिंटेन्डेण्ट) डॉ. वैशाली व्यावहारे यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार करण्यात आले होते.

​कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९:०० वाजता योग प्रात्यक्षिकाने झाली. या सत्रात सुश्री आकांक्षा नरनवरे यांनी उपस्थितांना विविध योगासने व योगाभ्यासाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्यास कशी मदत होते, याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.



​त्यानंतर सकाळी १०:०० वाजता जीवनशैली विकार जनजागृती विषयक विशेष सत्र पार पडले. या सत्रात सुश्री आकांक्षा नरनवरे यांनी जीवनशैली विकारांचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यात योगाचे महत्त्व पटवून दिले. नियमित योगाभ्यास, संतुलित आहार, शारीरिक सक्रियता आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब केल्यास विविध आजारांपासून बचाव करता येतो, असा मोलाचा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला.

​या शिबिरास हॉस्पिटलमधील रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

​वार्ताहर: अर्पित वाहाणे

मोबाईल: ८९५६६४७००४

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या