Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

गडचिरोलीत न्याय न मिळाल्याने ‘गुरुजी’ उपोषणाला; प्रशासनाच्या भूमिकेविषयी तीव्र संताप

 


वृत्तसंकलन: अर्पित वाहने 

​- वारंवार पत्रव्यवहार आणि भेटीगाठी करूनही न्याय नाही मिळाल्याचा आरोप

- प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा INTUC जिल्हाध्यक्षांचा इशारा

​गडचिरोली :

प्रशासकीय दिरंगाई आणि सततच्या पाठपुराव्यानंतरही न्याय न मिळाल्यामुळे गडचिरोलीतील एका पीडित शिक्षकाला (गुरुजी) अखेर  उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. दिलीप नैतम असे या उपोषणाला बसलेल्या शिक्षकाचे नाव असून, कालपासून त्यांनी गडचिरोली येथे जिल्हा लोकसभा परिसरासमोर उपोषण सुरू केले आहे. वारंवार पत्रव्यवहार आणि प्रशासकीय अधिकार्‍यांच्या भेटी घेऊनही मागण्यांची पूर्तता होत नसल्याने शिक्षकावर ही वेळ ओढवली आहे.

​काय आहे प्रकरण?

दिलीप नैतम हे गडचिरोली तालुक्यातील ग्रामस्थ रहिवासी असून जिल्हा परिषदेतील एका प्रलंबित समस्येसाठी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जिल्हा परिषद आणि संबंधित पोलीस स्टेशनच्या पायरी पायरीवर चकरा माराव्या लागल्या. परंतु, वारंवार चकरा मारूनही प्रशासनाकडून योग्य तो न्याय अथवा दाद मिळाली नाही. प्रशासनाच्या या उदासिन भूमिकेमुळे संतप्त झालेल्या शिक्षकाने अखेर लोकशाही मार्गाने उपोषणाचा बडगा उगारला आहे.

​INTUC जिल्हाध्यक्षांचा पाठिंबा व आंदोलनाचा इशारा

या घटनेची गंभीर दखल घेत INTUC चे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी उपोषणकर्त्या गुरुजींची प्रत्यक्ष भेट घेतली असून त्यांना लेखी निवेदन सादर केले आहे. समर्थ यांनी या प्रकरणाचा तातडीने पाठपुरावा सुरू केला आहे.

​यावेळी बोलताना दत्तात्रय समर्थ यांनी स्पष्ट केले की, "जर प्रशासनाने या उपोषणाची गंभीर दखल घेऊन गुरुजींना लवकरात लवकर न्याय दिला नाही, तर या प्रकरणी आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल."

​दरम्यान, न्याय मिळेपर्यंत गुरुजी मागे हटणार नाहीत, असा जाहीर निर्धार व्यक्त करण्यात आला असून, या प्रकारामुळे स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या