आर्वी (विशेष प्रतिनिधी):
बहुजन समाज पार्टी (बसपा) आर्वी विधानसभेची अत्यंत महत्त्वाची बैठक नुकतीच आर्वी शहराध्यक्ष अमोलभाऊ रंगारी यांच्या निवासस्थानी उत्साहात पार पडली.
या बैठकीत बहुजन नायक मान्यवर साहेब कांशीरामजी यांच्या आगामी ९ ऑक्टोबर रोजी अमरावती येथे होणाऱ्या विदर्भस्तरीय स्मृतिदिन कार्यक्रमाचे नियोजन आणि बसपा सुप्रीमो, 'आयरन लेडी' आदरणीय बहन कुमारी मायावतीजी यांच्या आगामी वाढदिवसाचे (जनकल्याणकारी दिन) आयोजन या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यासोबतच, आगामी नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आणि आर्वी विधानसभा कमिटीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
प्रमुख मार्गदर्शक व उपस्थिती:
या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून बसपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. ॲड. सुनीलजी डोंगरे उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना पक्षसंघटना बळकट करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच बैठकीस मा. अनोमदर्शी भैसारे साहेब (जिल्हाध्यक्ष, बसपा वर्धा) आणि मा. किशोर मेंढे साहेब (जिल्हा महासचिव, बसपा वर्धा) यांची विशेष उपस्थिती लाभली.
या बैठकीला आर्वी विधानसभा व शहर क्षेत्रातील सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपर्क व वृत्त सौजन्य:
अर्पित वाहाणे (मो. ८९५६६४७००४)

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या