अन्यथा कार्यकर्ते नगर परिषदेत 'डास' बनून घुसणार; नगराध्यक्षांना दिले निवेदन
विशेष प्रतिनिधी / अर्पित वाहाणे (मो. ८९५६६४७००४)
वर्धा, ३० सप्टेंबर २०२६:
वर्धा शहरात सध्या डासांचा प्रादुर्भाव कमालीचा वाढला असून नागरिक त्रस्त झाले आहेत. ठिकठिकाणी साचलेले घाण पाणी आणि नियमित साफसफाईचा अभाव यामुळे डेंग्यू व मलेरियासारख्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज AIMIM पक्षाच्या वतीने नगर परिषदेच्या नगराध्यक्षांना निवेदन देण्यात आले.
प्रशासनाने येत्या ३ दिवसांत शहरातील साफसफाई आणि फॉगिंगचे काम तातडीने सुरू न केल्यास AIMIM चे कार्यकर्ते नगर परिषदेत 'डास' बनून घुसतील, असा अनोखा आणि तीव्र इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
गटारांची अस्वच्छता अन् डासांचा उपद्रव
शहरातील मुख्य नाल्या व गटारांची नियमित साफसफाई होत नसल्याने अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
AIMIM च्या प्रमुख मागण्या:
- संपूर्ण वर्धा शहरातील नाल्या व गटारांची तातडीने सफाई करण्यात यावी.
- डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील सर्व प्रभागांमध्ये नियमित फॉगिंग मशीनद्वारे फवारणी करावी.
आंदोलनाचा इशारा
नगर परिषद प्रशासनाला या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ३ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत योग्य ती कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि आंदोलनाचा भाग म्हणून कार्यकर्ते नगर परिषदेत डास बनून प्रवेश करतील, असे निवेदनात नमूद केले आहे.
हे निवेदन देताना AIMIM वर्धा जिल्हा सोशल मीडिया प्रभारी आवेज़ शेख, राजिक खान, आमीन शेख, शेरू भाई, मुन्ना फारुकी आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या