Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

जयंती २' चित्रपटाचा विशेष नि:शुल्क शो आर्वीत उत्साहात संपन्न; गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतला आनंद

 



​आर्वी (विशेष प्रतिनिधी): अर्पित वाहने

स्थानिक पी. एम. श्री गांधी विद्यालय, आर्वी येथील इयत्ता ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी सौरभ मेघराज डोंगरे मित्र परिवाराच्या वतीने 'जयंती २' या चित्रपटाच्या विशेष नि:शुल्क शोचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक तिरुपती बालाजी टॉकीज येथे पार पडलेल्या या शोला विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

​विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी आणि त्यांना प्रेरणादायी विचार मिळावेत, या उद्देशाने या विशेष खेळाचे (शो) आयोजन करण्यात आले होते. या शोदरम्यान 'जयंती २' चित्रपटातील सहकलाकार प्रसेनजीत दिघाडे यांनी उपस्थितांशी संवाद साधून विद्यार्थ्यांना विशेष भेट दिली. त्यांच्या उपस्थितीने विद्यार्थ्यांमधील उत्साह द्विगुणीत झाला.

​चित्रपट पाहताना विद्यार्थ्यांनी दाखवलेला उत्साह आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून हा संपूर्ण उपक्रम अत्यंत यशस्वी व अविस्मरणीय ठरल्याचे आयोजकांनी सांगितले. विद्यार्थ्यांपर्यंत सामाजिक व सकारात्मक संदेश पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे सौरभ मेघराज डोंगरे मित्र परिवाराने स्पष्ट केले. या उपक्रमाबद्दल शाळा प्रशासन, शिक्षकवृंद व पालकांनी आयोजकांचे विशेष आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या