Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

नाशिक येथे होणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या राज्यस्तरीय युवा महोत्सवात कौस्तुभ पाचडेची निवड

 



​अमरावती (विशेष प्रतिनिधी):

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा अमरावती विभागस्तरीय युवा महोत्सव काल अमरावती येथील केंद्रात उत्साहात पार पडला. या महोत्सवामध्ये विविध कला व बौद्धिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

​या स्पर्धेत श्री शिवाजी कला महाविद्यालय केंद्राचा व पत्रकारिता शाखेचा विद्यार्थी कौस्तुभ पाचडे याने आपली छाप पाडत वाद-विवाद आणि वक्तृत्व या दोन्ही स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवले. या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर नाशिक येथे होणाऱ्या आगामी राज्यस्तरीय युवक महोत्सवासाठी अमरावती विभागातून त्याची निवड झाली आहे. कौस्तुभच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्याचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

​वार्ताहर: अर्पित वाहाणे

संपर्क: ८९५६६४७००४

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या