Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

कारंजा तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत राजीव गांधी कॉलेजचा नवल मोहोड प्रथम

 



कारंजा:

येथील तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत राजीव गांधी ज्युनियर कॉलेजच्या नवल प्रवीण मोहोड याने १७ वर्षे वयोगटात उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या यशामुळे शालेय वर्तुळात व सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.

​नवल मोहोड हा सध्या राजीव गांधी ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता ११वीत शिकत असून, त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, तरोडा येथे झाले आहे. शालेय वयापासूनच बुद्धिबळाची आवड असलेल्या नवलने सातत्यपूर्ण सराव, अचूक चाली, एकाग्रता आणि उत्कृष्ट रणनीतीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत हे यश संपादन केले.

​"शिक्षकांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि विश्वास यामुळेच मला हे यश मिळवता आले," अशा शब्दांत नवलने आपल्या यशाचे श्रेय शिक्षकांना दिले.

​त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राजीव गांधी ज्युनियर कॉलेजचे शिक्षक, जि. प. शाळा तरोडा येथील शिक्षक वृंद, पालक तसेच मित्रपरिवाराने त्याचे अभिनंदन करून पुढील क्रीडा प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

वार्ताहर : अर्पित वाहणे (मो. ८९५६६४७००४)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या