Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

शीर्षक नाही

 


बाजारवाडा येथे भव्य तान्हा पोळा उत्साहात संपन्न: लहान मुलांच्या नंदीबैल सजावटीने वेधले लक्ष

बाजारवाडा 

बाजारवाडा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा भव्य तान्हा पोळ्याचे अतिशय उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती युवा सेना जिल्हाप्रमुख (वर्धा) माननीय श्री. महेशभाऊ चौधरी यांची लाभली. याप्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​कार्यक्रमाची सुरुवात महादेवाच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. रवीभाऊ धनगर, डॉ. किशोर धनगर, मा. श्री. सुरेशराव बरडे आणि मा. श्री. मोरेश्वरराव चंपतराव चौधरी उपस्थित होते.

​तान्हा पोळ्याच्या निमित्ताने सुमारे १२० ते १३० बालगोपाल आपल्या आकर्षक नंदीबैलांसह सहभागी झाले होते. बक्षीस वितरणादरम्यान केवळ नंदीबैलाच्या उंचीवर भर न देता, स्वतःच्या हाताने केलेली देखणी आणि कलात्मक सजावट लक्षात घेऊन विजेते ठरवण्यात आले. यामुळे सर्वसामान्य व गरीब शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या कौशल्याला योग्य वाव मिळाला.

गुणवंत बालकांचा गौरव व पारितोषिक वितरण:

  • प्रथम पारितोषिक (₹१,००१): कु. आर्यन चरणदासजी कठाणे (दराते: मा. श्री. मोरेश्वर चंपतराव चौधरी)
  • द्वितीय पारितोषिक (₹५०१): कु. यामिनी / भीमा अमोलभाऊ बरडे (दराते: मा. श्री. सुरेशरावजी बरडे)
  • तृतीय पारितोषिक (₹२०१): कु. विधी विपुलराव पाटील (दराते: पोलीस पाटील सौ. अमिताताई रवींद्र धनगर)
  • चतुर्थ पारितोषिक (₹१०१): कु. सार्थक श्रीधरराव ढोले (दराते: डॉ. किशोरभाऊ धनगर)
  • पांचवे पारितोषिक (₹१०१): कु. रियांशी मंगेश कठाणे (दराते: मा. श्री. प्रीतमभाऊ गुजर)

​कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सर्व बालकांना खाऊचे वाटप करण्यात आले. संपूर्ण गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा अतिशय आनंददायी वातावरणात पार पडला.

माहिती व छायाचित्र: अर्पित वाहाणे (मो. ८९५६६४७००४)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या