Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

वर्धा शहर DB पथकाची धडक कारवाई: ४ चोरीच्या गाड्यांसह आरोपी अटकेत!

 



वर्धा, नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस; २.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

वर्धा (विशेष बातमीदार): सचिन हाडके

वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने (DB Team) धडक कारवाई करत दुचाकी चोरणाऱ्या सराईत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीकडून सुमारे २ लाख १५ हजार रुपये किमतीच्या एकूण ४ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, या कारवाईमुळे वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या विविध गुन्ह्यांचा उघडकीस झाला आहे.

घटनेची पार्श्वभूमी व कारवाई:

​दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी वर्धा येथील नालंदा नगर महिला आश्रम परिसरातून ६० हजार रुपये किमतीची होंडा ॲक्टिव्हा (MH-32-BF-1546) चोरीला गेली होती. फिर्यादीच्या तक्रारीवरून वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक १३०३/२०२६, कलम ३०३(२) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास चक्रावली गेली होती.

​तपासादरम्यान ९ सप्टेंबर २०२६ रोजी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे वर्धा शहर DB पथकाने संशयित आरोपी अनुराग प्रवीण धाबर्डे (वय २१ वर्षे, रा. तलोडी, ता. सेलू, जि. वर्धा) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने सदर ॲक्टिव्हा चोरीसह नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातूनही दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

उघडकीस आलेले इतर गुन्हे व जप्त वाहने:

​आरोपीच्या माहितीवरून पोलिसांनी खालीलप्रमाणे एकूण ४ दुचाकी (किंमत ₹२,१५,०००/-) जप्त केल्या आहेत:

  1. होंडा ॲक्टिव्हा (MH-32-BF-1546) – किंमत ₹६०,०००/- (पो.स्टे. वर्धा शहर)
  2. होंडा शाईन (MH-40-BM-1977) – किंमत ₹५०,०००/- (पो.स्टे. हिंगणा, जि. नागपूर - गुन्हा क्र. ३८४/२६)
  3. रॉयल एनफिल्ड (MH-34-AX-1120) – किंमत ₹१,५०,०००/- (पो.स्टे. राजुरा, जि. चंद्रपूर - गुन्हा क्र. ७१३/२६)
  4. हिरो होंडा स्प्लेंडर प्लस (MH-32-S-8869) – किंमत ₹१५,०००/- (पो.स्टे. वर्धा शहर - गुन्हा क्र. १५०८/२६)

पोलीस कस्टडी व पुढील तपास:

​आरोपीस न्यायालयाने १० ते ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड सुनावली होती. आरोपीकडून आणखी काही दुचाकी चोरीचे गुन्हे, वाहनांची विल्हेवाट लावण्याचे प्रकार तसेच या गुन्ह्यात अन्य साथीदारांचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

तपास पथक व मार्गदर्शन:

​सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील महाडिक आणि वर्धा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. नागेश कुमार चतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

​थेट कारवाईत गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. शरद गायकवाड, हवालदार महेंद्र पाटील, हवालदार अभिजित वाघमारे, पोलीस अंमलदार रंजित भुरसेपोलीस अंमलदार अमोल साळवण यांनी मोलाची भूमिका बजावली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या