Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीत वर्धा जिल्ह्याचा अहवाल सादर; राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांचा सत्कार

 



वर्धा / अंबाजोगाई:

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची दोन दिवशीय राज्य कार्यकारिणी बैठक दि. १२ व १३ सप्टेंबर रोजी अंबेजोगाई (जि. बीड) येथील 'मानवलोक' संस्थेच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत वर्धा जिल्हा शाखेच्या वतीने उत्कृष्ट कामिगीरीचा सविस्तर अहवाल सादर करण्यात आला, तसेच 'महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार' मिळाल्याबद्दल राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांचा राज्य कार्यकारिणीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आया.

अहवालातील ठळक बाबी व उपक्रम

वर्धा जिल्हा शाखेचा ७ जून ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीतील सविस्तर अहवाल राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी राज्य कार्यकारिणीसमोर मांडला. यात प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश होता:

  • तालुकास्तरावरील उपक्रम: वर्धा शहरातील शाळा-महाविद्यालये तसेच ग्रामीण भागात राबवलेले उपक्रम; आर्वी, आष्टी, कारंजा, हिंगणघाट, सेलू, देवळी आणि समुद्रपूर शाखांद्वारे आयोजित विविध कार्यक्रम.
  • संघटनात्मक वाढ: 'अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र' वर्गणीदार नोंदणी, नवीन सदस्य नोंदणी आणि नियमित शहर शाखा बैठकांचा आढावा.
  • आर्थिक नियोजन: जमा करण्यात आलेल्या देणगी व जाहिरातींचा सविस्तर हिशोब.
  • आगामी नियोजन: पुढील चार महिन्यांत जिल्ह्यात राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचे सविस्तर विवेचन.

३० जिल्ह्यांतील १०० हून अधिक कार्यकर्त्यांची उपस्थिती

या राज्य कार्यकारिणी बैठकीला राज्यातील ३० जिल्ह्यांमधून १०० पेक्षा जास्त प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यात २३ विभागांच्या राज्य कार्यवाहांनी आपल्या विभागांचे अहवाल मांडले. वर्धा शाखेने सादर केलेल्या उत्कृष्ट अहवालाची राज्य कार्यकारिणीने विशेष नोंद घेतली.

प्रमुख उपस्थीत मान्यवर

समारोपीय कार्यक्रमात मंचावर राज्य कार्याध्यक्ष प्रा. संजय बनसोडे (सांगली), राज्य अध्यक्ष माधव बावगे (लातूर), राज्य प्रधान सचिव विनायक सावळे (शहादा), डॉ. ठकसेन गोराणे (नाशिक) आणि विजय परब (मुंबई) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्थानिक शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

वार्ताहर: अर्पी वाहाणे (मो. ८९५६६४७००४)

(विशेष प्रतिनिधी, वर्धा)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या