प्रशिक्षित धम्म प्रचारकच धम्म चळवळीला अधिक गतिमान करू शकतात – राष्ट्रीय सचिव बी. एच. गायकवाड
आर्वी (विशेष प्रतिनिधी): अर्पित वाहणे
दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा), तालुका शाखा आर्वीच्या वतीने वर्षावासाच्या पावन पर्वानिमित्त सोमवारी (दि. १४ सप्टेंबर २०२६) सिद्धार्थ बुद्ध विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, आर्वी येथे तालुकास्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण व चिंतन शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराला तालुक्यातील सर्व पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक-शिक्षिका, बौद्धाचार्य, हितचिंतक आणि उपासक-उपासिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन राज्य संघटक तथा प्रभारी आद. विजयकुमार चौरपगार यांच्या हस्ते झाले. तालुका अध्यक्ष आद. मधुकरराव सवाळे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय सचिव आद. बी. एच. गायकवाड उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना आद. बी. एच. गायकवाड यांनी, "प्रशिक्षित धम्म प्रचारक धम्म चळवळ गतिमान करू शकतात," असा विश्वास व्यक्त केला. तर आद. विजयकुमार चौरपगार यांनी बौद्ध धम्माचा प्रसार आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे आवाहन केले.
शिबिराची प्रमुख वैशिष्ट्ये व चिंतन:
- सक्रिय कार्यकर्ता निर्मिती: केवळ प्रेक्षक न राहता प्रत्यक्ष धम्मकार्य करणारे सक्रिय कार्यकर्ते घडविणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.
- मानवतावादी मूल्यांचा प्रसार: भगवान बुद्धांचा धम्म हा संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग आहे. आजच्या समाजात शांती आणि नैतिक मूल्ये रुजविण्याची गरज याप्रसंगी व्यक्त करण्यात आली.
- ग्रामीण भाग केंद्रित नियोजन: तालुक्यातील विविध गावांमधील पदाधिकाऱ्यांच्या सहभागाने गावपातळीवर संघटन मजबूत करणे आणि नियमित उपक्रम राबविण्याचा निर्धार करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती:
या प्रसंगी वर्धा जिल्हाध्यक्ष आद. राहुल एम. गायकवाड, जिल्हा सरचिटणीस आद. मधुकरराव वानखेडे, महिला जिल्हाध्यक्ष आद. रमाताई सोनपितळे, वरिष्ठ केंद्रीय शिक्षक संजय वानखेडे (हिंगणघाट), जिल्हा संघटक व आर्वी तालुका निरीक्षक आद. सुरेशजी भिवगडे आणि रमेशजी जोगे, केंद्रीय शिक्षिका सुनंदा तायडे व उमाताई इंगोले, राजेश चौरपगार, पुरुषोत्तम वंजारी आणि घनश्याम जीवतोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आयोजनासाठी परिश्रम:
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर्वी तालुका कार्यकारिणीचे हिरामणजी बोरकर (सरचिटणीस), विनोद डोमे (कोषाध्यक्ष), राजेश पाचोडे, विलास काळपांडे, वंदनाबाई मेघ्राम, राहुल शेंडे, विनिता नारे, दिक्षा गडलिंग, प्रल्हादराव रामटेके, सचिन दखने, भिमराव काटसरे, जनार्धन नागदिवे, योगेन्द्र पाटील, सपना बडगे यांच्यासह महिला प्रतिनिधी आणि अंतरडोह, बोरगाव, पिंपरी, किन्हाळा, सर्कसपूर, रोहणा, देवगाव, धनोडी यासह तालुक्यातील ३० हून अधिक गावांतील ग्रामीण पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
"बहुजन हिताय–बहुजन सुखाय" या धम्मविचाराने प्रेरित होऊन भारतीय बौद्ध महासभेचे कार्य अधिक व्यापक करण्याचा संकल्प करत शिबिराची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या