हिंगणघाट (विशेष प्रतिनिधी): सचिन हाडके
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा यांच्या वतीने हिंगणघाट येथील नगर परिषद वाचनालयाच्या टाका ग्राउंडवर आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती क्रीडा स्पर्धेत भारत विद्यालय, हिंगणघाटच्या खेळाडूंनी अभूतपूर्व यश संपादन केले आहे. १४, १७ व १९ वर्षांखालील वयोगटात चमकदार कामगिरी करत या विद्यालयातील तब्बल २२ खेळाडूंनी सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
स्पर्धेत उत्कृष्ट कुस्ती कौशल्याचे प्रदर्शन करत सुवर्णमय कामगिरी करणारे विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे:
- गर्ल्स/बॉईज विभाग: कु. लक्ष्मी कोकडे, कु. मनस्वी जवादे, कु. मानसी अजय शेराम, कु. निवृत्ती धोटे, कु. पल्लवी मुळे, कु. पायल इंगळकर, कु. इशा खेळकर, कु. स्वरा सतमवार, कु. तनिष डभारे, कु. भावेश भुते, कु. गणेश गुंजेवार, कु. अजिंक्य सूर्यवंशी, कु. प्रणव परमोरे, कु. सम्यक बलवीर, कु. मोनीष सोनुले, कु. आदित्य देवडे, कु. अश्विन ठमके, कु. विश्वास, कु. कृष्णा भोकरे, कु. मयंक जीवनकर, कु. कनिका राजेश मुळे व कु. मंथन भुते.
या सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची आता आगामी विभाग स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असून सर्व खेळाडू पुढील आव्हानासाठी सज्ज झाले आहेत.
खेळाडूंच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विरा स्पोर्टींग क्लबचे संचालक अध्यक्ष मा. अजय मुळे सर, मार्गदर्शक मा. अनिल भाऊ जवादे, शाळेच्या प्राचार्या खैरकर मॅडम, तालुका क्रीडांगण संयोजक बी. एल. खांडरे सर, नानोटकर सर, विलास भोमले सर, दिनेश वाघ सर, गोपाल मांडवकर सर, पंकज ठाकरे सर, माटे मॅडम, राम मेश्राम, बबलू जवादे, संजय भुते, सुमित हिंगे, राहुल घोटकर, बालू वैद्य, बालू सावध, योगेश झापे, हेमाताई दुरबुडे, सौरभ डहाळकर, सुधांशू धोबे, रोहित मुळे, गोलू पाल, भूषण तराळे, प्रेम जवादे, अनुष्का सोमलकर, आशिष वानखेडे, नंदनी पाल, गोल्डी जीवनकर, अजय शेराम, श्याम इजमुलवार, शरद भोकरे, रवी दुरबुडे, अनिल मुन, केशव दोडके, भारत मुन, किसना ठाकरे तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद व क्रीडाप्रेमींनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले व विभाग स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या