Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

पिंपरी (भुतडा) येथे खासदार अमर काळे यांच्या हस्ते तब्बल १.४० कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

 



आर्वी/पिंपरी (भुतडा):

आर्वी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देत, जनतेच्या मूलभूत प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचा संकल्प खासदार मा. श्री. अमरजी काळे यांनी व्यक्त केला आहे. पिंपरी (भुतडा) येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात खासदार अमर काळे यांच्या शुभहस्ते तब्बल १ कोटी ४० लाख ९० हजार रुपये खर्चाच्या विविध नागरी व ग्रामीण विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन उत्साहात संपन्न झाले.

​गावातील नागरिकांच्या दैनंदिन समस्या प्रत्यक्ष जाणून घेत, त्यांच्या गरजेनुसार विकासकामांना गती देण्याचा खासदार काळे यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहे. या सोहळ्यात खालील प्रमुख कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले:

  • पशुवैद्यकीय दवाखाना नवी इमारत: ₹५२ लाख
  • सुसज्ज ग्रामपंचायत भवन: ₹२२ लाख
  • जि. प. प्राथमिक शाळेची संरक्षण भिंत: ₹२० लाख
  • पिंपरी बस स्टॉप ते शेवंताबाई धुर्वे घरापर्यंत डांबरीकरण: ₹४६.९० लाख

​जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहून, आर्वी परिसराच्या विकासासाठी सतत पाठपुरावा करणाऱ्या खासदार अमर काळे यांच्या या उपक्रमाबद्दल पिंपरीवासीयांनी समाधान व आभार व्यक्त केले आहेत.

(विशेष वृत्त / संकलन: अर्पित वाहाणे - मो. ८९५६६४७००४)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या