Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

'तीर्थ धोंडापाणी, देव रोकडा सज्जनी' : बाजारवाडा येथे ह.भ.प. गजानन महाराज दिघडे यांचे समाजप्रबोधनात्मक कीर्तन

 


आर्वी (विशेष प्रतिनिधी): अर्पित वाहणे 


"देव दगडात किंवा तीर्थक्षेत्राच्या पाण्यात नसून तो माणसाच्या सेवेत आहे. दीन-दुबळे, अनाथ व अपंगांची सेवा करणे हाच खरा धर्म आहे," असे प्रतिपादन ह.भ.प. गजानन महाराज दिघडे यांनी केले.

​बाजारवाडा येथे दररोजप्रमाणे आयोजित समाजप्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते. कीर्तनाचा आस्वाद घेण्यासाठी गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

​संत गाडगेबाबांच्या विचारांचा धागा पकडत महाराजांनी सांगितले की, "मुलामुलींना शिक्षण द्या, ज्यामुळे गावाचे भूषण वाढेल. देवळात जाण्यापेक्षा, अंधश्रद्धा, मंत्र-तंत्र आणि सावकारी कर्जात अडकण्यापेक्षा शिक्षणाचा आणि सेवेचा मार्ग धरा." गाडगेबाबांनी आयुष्यभर समाजातील अज्ञान, अस्पृश्यता, अनिष्ट रूढी-परंपरा आणि प्राण्यांची हत्या यांविरोधात लढा दिला. त्यांनी वऱ्हाडी बोलीतून लोकांना सोप्या भाषेत प्रबोधन करत रंजल्या-गांजल्यांच्या सेवेसाठी शाळा, आश्रम व धर्मशाळा उभारल्या, असेही त्यांनी अधोरेखित केले.

गुणीजनांचा व कलावंतांचा सत्कार

​कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे व साथीदारांचे स्वागत करण्यात आले:

  • ह.भ.प. गजानन महाराज दिघडे यांचे स्वागत गुरुदेव सेवक राजूभाऊ चौधरी यांनी केले.
  • हार्मोनियम वादक नितीनजी कुबडे यांचे स्वागत संजय मेहरे यांनी केले.
  • तबला वादक दिनकरराव राऊत यांचे स्वागत कु. आयुष काळे यांनी केले.
  • श्री. सुधीर इंगळे यांचे स्वागत कु. हर्षल मढवे यांनी केले.
  • श्री. गोपाळभाऊ ठाकूर यांचे स्वागत श्री. अंकुश ढोले यांनी केले.
  • वाहनाचे चालक श्री. इंगोले भाऊ यांचे स्वागत कु. अमर बरडे यांनी केले.

​कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन महेश चौधरी यांनी केले, तर उपस्थितांचे व ग्रामस्थांचे आभार मा. श्री. नरेंद्रजी चौधरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाजारवाडा ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले.

बातमी संकलन / बातमीदार: अर्पित वाहाणे (मो. ८९५६६४७००४)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या