Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

महाप्रजापती गौतमी बुद्ध विहारात धम्म मार्गदर्शन, बुद्ध वंदना व भोजनदानाचा कार्यक्रम उत्साहात

 


वर्षावासानिमित्त आर्वीत धम्ममय वातावरण

महाप्रजापती गौतमी बुद्ध विहारात धम्म मार्गदर्शन, बुद्ध वंदना व भोजनदानाचा कार्यक्रम उत्साहात

आर्वी, जि. वर्धा (विशेष प्रतिनिधी - अर्पित वाहाणे, मो. 8956647004) :

वर्षावासानिमित्त महाप्रजापती गौतमी बुद्ध विहार महिला मंडळ, वाल्मिकी वार्ड (बालाजी वॉर्ड), आर्वी यांच्या वतीने महाप्रजापती गौतमी बुद्ध विहार येथे धम्म मार्गदर्शन, बुद्ध वंदना आणि भोजनदान कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. शनिवार, १९ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या या सोहळ्याला उपासक-उपासिका तसेच बौद्ध बांधवांची मोठी उपस्थिती लाभली.

भिक्खू संघाकडून त्रिशरण पंचशील व धम्म मार्गदर्शन

कार्यक्रमा दरम्यान भंते रेवत बोधी, भंते धम्मरत्न टाकरखेडा आणि पूज्य अय्याजी माटोडा-बेनोडा यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील देऊन वर्षावासाचे महत्त्व, भगवान बुद्धांचा धम्म आणि धम्माचरणावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे आर्वी तालुकाध्यक्ष मधुकरजी सवाळे यांनी महामंगल सुत्तावर विचार मांडले.

शिक्षण, संस्कार आणि पाली भाषेवर मान्यवरांचे विचार

भारतीय बौद्ध महासभेचे वरिष्ठ जिल्हा संचालक व आर्वी तालुका निरीक्षक सुरेशजी भिवगडे यांनी वर्षावासात उपासकांची भूमिका स्पष्ट केली. नगरसेवक प्रा. पंकज वाघमारे यांनी शिक्षण आणि संस्काराचे महत्त्व सांगितले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासालयाच्या संचालिका प्रा. डॉ. विजयाताई मुळे यांनी पाली भाषा व साहित्यावर मार्गदर्शन केले.

धम्मगीतांनी वातावरणात भरली प्रसन्नता

नागपूरचे संविधान प्रचारक सुनील कांबळे यांनी सादर केलेल्या धम्मगीतांनी संपूर्ण परिसर धम्ममय झाला. यावेळी धम्म प्रचारक मिलिंदजी खाकसे (आखातवाडा), भारतीय बौद्ध महासभेचे तालुका उपाध्यक्ष विलास काळबांडे, योगेश पाटील, प्रमोद भगत, आणि अरुण दहाट यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

भोजनदान व महिला मंडळाचा पुढाकार

प्रवचनानंतर भिक्खू संघ आणि उपस्थितांसाठी भोजनदानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सत्यफुला भगत, मंदा टोकसे, शारदा मून, नीलिमा भगत, मंदा दहाट, रंजना पखाले, सविता ढाणके, वैजयंती वानखेडे, कविता वानखेडे, सुप्रिया भोगे, प्रज्ञा भगत, काजल मनवर, मालता पोहणे, वंदना पखाले, छाया पखाले, अनुष्का भगत, सविता गवळी यांच्यासह महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. आयोजकांनी सर्व सहभागींचे आभार मानले.

फोटो कॅप्शन:

आर्वी : महाप्रजापती गौतमी बुद्ध विहारात वर्षावासानिमित्त आयोजित धम्म मार्गदर्शन व भोजनदान कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित भिक्खू संघ, मान्यवर व उपासक-उपासिका. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या