वर्धा (विशेष प्रतिनिधी): अर्पित वाहणे
जनतेच्या मूलभूत व हिताच्या प्रश्नांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. रस्ते, खड्डे व इतर सोयी-सुविधांबाबत चर्चा करण्यासाठी गेलेले ए.आय.एम.आय.एम. (AIMIM) चे वर्धा जिल्हाध्यक्ष आसिफ खान यांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप-विभागीय अभियंता रोहित चंदेले यांनी समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमके प्रकरण काय?
जनतेच्या मूलभूत समस्या व रस्त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाध्यक्ष आसिफ खान हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात उप-अभियंता रोहित चंदेले यांच्या भेटीला गेले होते. यावेळी अधिकाऱ्याने समस्येचे निरसन करण्यासाठी ठोस कार्यवाही करणे अपेक्षित असताना, त्यांनी जबाबदारी टाळत चालढकल केली व अपमानास्पद वागणूक दिल्याचा गंभीर आरोप पक्षाकडून करण्यात आला आहे.
जाहीर माफीची मागणी आणि उपोषणाचा इशारा
या प्रकारामुळे ए.आय.एम.आय.एम. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. रोहित चंदेले यांनी या कृत्याबद्दल जनतेची व पक्षाची जाहीर माफी मागावी, अशी ठाम मागणी जिल्हाध्यक्ष आसिफ खान यांनी केली आहे.
तसेच उप-अभियंता चंदेले यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत, या मागणीसाठी येत्या सोमवारपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे. संबंधित विभागाने जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता तात्काळ योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
बातमीदार: अर्पित वाहाणे
संपर्क: 8956647004

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या