Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा दणका! वर्धेत हिंदी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे अखेर मागे

 



​विशेष प्रतिनिधी (अर्पित वाहाणे) | वर्धा

​वर्धा:

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने सोमवारी (२८ सप्टेंबर) भव्य 'शिक्षण अधिकार बचाव मोर्चा' काढण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते तथा राज्य कार्यकारिणी सदस्य सुजात आंबेडकर यांच्या आक्रमक नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चाला अखेर मोठे यश मिळाले आहे. मोर्चानंतर विद्यापीठ प्रशासनासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेत विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या असून, आंदोलक विद्यार्थ्यांवरील दाखल गुन्हे (FIR) आणि प्रवेशबंदीचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

​विद्यार्थ्यांच्या मुख्य मागण्या:

विद्यापीठातील विद्यार्थ्यांना चांगली मेस सुविधा पुरवणे, स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, अचानक बंद करण्यात आलेले अभ्यासक्रम पूर्ववत सुरू करणे, तसेच गेल्या दहा वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या विविध सोयी-सुविधांची तातडीने अंमलबजावणी करणे, अशा मागण्यांसाठी विद्यार्थी दीर्घकाळापासून लढा देत होते.

​दडपशाहीला आंदोलकांचे उत्तर:

या रास्त मागण्यांसाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या सहा दलित-बहुजन विद्यार्थ्यांवर विद्यापीठ प्रशासनाने पोलीस तक्रार दाखल करून एफआयआर नोंदवला होता. इतकेच नव्हे, तर त्यांना विद्यापीठात प्रवेशबंदीही लागू केली होती. प्रशासनाच्या या दडपशाहीविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनाने 'शिक्षण अधिकार बचाव मोर्चा'च्या माध्यमातून जोरदार एल्गार पुकारला.

​प्रशासनाला नमते घ्यावे लागले:

मोर्चानंतर सुजात आंबेडकर आणि विद्यार्थी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने विद्यापीठ प्रशासनासोबत बैठक घेतली. आंदोलनाचा वाढता दबाव पाहून विद्यापीठ प्रशासनाला माघार घ्यावी लागली. प्रशासनाने सहा विद्यार्थ्यांवरील एफआयआर मागे घेण्याचे मान्य केले असून, त्यांच्यावरील प्रवेशबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या इतर मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. या विजयामुळे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या