Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

आयआयटी मुंबईतील साहिल वाकोडे हत्या प्रकरण: न्यायासाठी पालकांचे आझाद मैदानावर आमरण उपोषण; पोलिसांच्या निराशाजनक तपासावर अर्पित वाहाणे यांचा तीव्र संताप

 



​विशेष प्रतिनिधी | मुंबई

​आयआयटी मुंबई (IIT Bombay) येथील होनहार आणि स्कॉलर विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या संस्थात्मक हत्येनंतर (Institutional Murder) त्याच्या कुटुंबाला अजूनही न्यायाची प्रतीक्षा आहे. साहिलला न्याय मिळावा यासाठी त्याचे आई-वडील सध्या मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनस्थळी भेट देऊन सामाजिक कार्यकर्ते अर्पित वाहाणे यांनी वाकोडे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली व त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला.

​यावेळी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात अर्पित वाहाणे म्हणाले की, "साहिल वाकोडे हा अत्यंत हुशार आणि गुणवंत विद्यार्थी होता. त्याच्या मागील शैक्षणिक आणि परीक्षेच्या रेकॉर्डवरून त्याची गुणवत्ता स्पष्टपणे दिसून येते. अशा गुणवंत विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे."

​पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह आणि आरोपींना पाठीशी घालण्याचा संशय

​आंदोलनस्थळी उपस्थित वकिलांशी केस संदर्भात सविस्तर चर्चा केल्यानंतर, या प्रकरणातील पोलीस तपासावर अर्पित वाहाणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "या प्रकरणातील पोलिसांची भूमिका अत्यंत निराशाजनक आहे. ज्यांच्यावर थेट आरोप करण्यात आले आहेत, त्यांना अद्याप चौकशीसाठी साधे बोलावण्यात आलेले नाही किंवा कोर्टासमोर हजर करण्यात आलेले नाही. पोलीस प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत आहे?"

​मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर शंका

​तपासातील दिरंगाईवर बोट ठेवत वाहाणे यांनी थेट राज्य सरकारवर निशाणा साधला. "अशा अत्यंत संवेदनशील प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे तर अभय नाही ना? असा संशय निर्माण होत आहे. कारण मुख्यमंत्र्यांच्या किंवा वरिष्ठ पातळीवरील सांगण्याशिवाय पोलीस असा पाठीशी घालणारा आणि ढिसाळ तपास करू शकत नाहीत," असा गंभीर आरोप त्यांनी केला.

​साहिल वाकोडे याला लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास आणि दोषींवर कडक कारवाई न झाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

​संपर्क:

अर्पित वाहाणे – ८९५६६४७००४

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या